नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २० जून २०२०) प्राप्त झालेल्या अहवालात अजून २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याआधी शनिवारी दुपारी आलेल्या अहवालात 14 कोरोनाबाधीतांची नोंद झाली होती.
या प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: देवळाली-८, लहवित-१, जाखोरी-१, सिन्नर-६, आंबे दिंडोरी-१, निल्वंडी-१, बसवंत पिंपळगाव-८ अशा एकूण २६ रुग्णांचा समावेश आहे.