नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ९ मे) ३०२५ रुग्ण कोरोनामुक्त; नवीन रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारच्या तुलनेत वाढ झाली असून ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ९ मे) ३००२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १५८४, नाशिक ग्रामीण: १२२०, मालेगाव: ११५ तर जिल्हा बाह्य: ८३ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ११, नाशिक ग्रामीण: २६, मालेगाव: ३ असा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ३०२५ इतके कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.