नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २५ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २५ जुलै) एकूण ११४ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४३, नाशिक ग्रामीण: ६६, तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २५ जुलै) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १५१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय करण्यास वेळेचे निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र सायंकाळी ४ नंतरही अनेक दुकाने सुरु असतात. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जे व्यावसायिक प्रामाणिकपणे नियमांचे पालन करतात त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?