नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २३ जून २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २३ जून २०२१) ३३८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ९६, नाशिक ग्रामीण: २३६, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १, नाशिक ग्रामीण: ०३, मालेगाव: ०० असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १३६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्याचप्रमाणे आज रोजी पोर्टलवर अपडेट झालेले कोरोनामुळे एकूण मृत्यू ६९ आहेत. यात नाशिक शहर: ३९, तर नाशिक ग्रामीण: ३० असा समावेश आहे.