नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १७ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. १७ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी १५८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १२२, नाशिक ग्रामीण: ३९, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत कोरोनामुळे ४ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकूण १६३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाची आकडेवारी कमी होत असली तरीही नाशिककरांनी अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. नाशिक शहरात अनलॉक झाल्यापासून नाशिक शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आहे. नाशिक कॉलिंग आवाहन करत आहे की अजून कोरोना गेलेला नाही. त्यामुळे सगळ्यांनी अजूनही आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे.