नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १७ जुलै) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १७ जुलै) १३८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७२, नाशिक ग्रामीण: ५९, मालेगाव: ३ तर जिल्हा बाह्य: ४ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शनिवारी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: ६ असा समावेश आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १३४ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सूर होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ‘चला मुलांनो, शाळेत चला’ या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील 335 कोरोनामुक्त गावांतील 8 वी ते 12 वीच्या शाळा सोमवार पासून सुरू होणार आहेत.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: स्वाईन फ्ल्यूचे 3 रुग्ण; एकाचा मृत्यू, दोघे ठणठणीत !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790