नाशिक जिल्ह्यातील अजून एक रुग्ण झाला कोरोनामुक्त !

नाशिक(प्रतिनिधी): एकीकडे मालेगावचे कोरोनाबाधीतांचे आकडे वाढत असतांना एक दिलासादायक बातमी आली आहे. मालेगाव येथील रुग्णालयात दाखल असलेला चांदवड येथील रहिवासी कोरोनामुक्त झाला आहे. हा रुग्ण चांदवड टोल नाक्यावरील कर्मचारी आहे जो मालेगाव येथील सामान्य रुग्णलयात दाखल होता, त्याचे 14 दिवसांनंतर 24 तासाच्या अंतराने केलेले दोन्ही स्वॅब रिपोर्ट  निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.