कोरोनासाठी नाशिक महानगरपालिकेची हेल्पलाईन; नंबर्स सेव्ह करून ठेवा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे. नाशिक महानगर पालिका हद्दीतील नागरिकांना कोरोना विषयी कोणतीही माहिती आवश्यक असल्यास तसेच याबाबत कुठलीही अडचण निर्माण झाल्यास त्यांना त्वरीत मदत प्राप्त व्हावी या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने  कोरोना आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी १)०२५३-२३१७२९२ , २) ९६०७४३२२३३ , ३) ९६०७६०११३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला 24×7  मदत मिळणार आहे.तरी नागरिकांनी या हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.