नाशिक (प्रतिनिधी): गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेत रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदी मुंबईतील समीर उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्त हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. महानगरपालिकेतील नलावडे आणि सोनकांबळे या दोन्ही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामकाजावर काहीसा परिणाम जाणवत होता. राज्यपालांचे उपसचिव कैलास बधान यांनी या बदलीचे आदेश काढले आहेत.