नाशिक शहरात गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) ३९४ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) ३९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १६७५, एकूण कोरोना रुग्ण:-५५,९४९, एकूण मृत्यू:-७९२ (आजचे मृत्यू ०४), घरी सोडलेले रुग्ण :- ५०,९१८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४२३९ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) सैलानी बंगला, कर्ण नगर,पेठरोड, नाशिक येथील ५६ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) एन ९ डी,१४-४,वैष्णवी ज्वेलर्स जवळ, वीर सावरकर चौक, नवीन सिडको,नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) गुरुकृपा रो हाऊस क्र ९, गणेश मंदिर, सैलानी बाबा स्टॉप, जेलरोड नाशिक येथील ५३ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) १३-एन.डी.ए.टॉवर, उंटवाडी रोड,संभाजी चौक नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.