जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त; ८ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७३  हजार १११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८ हजार ९७९  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३१० ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ६८१, चांदवड १६२ , सिन्नर ८३५, दिंडोरी २५०, निफाड ७५३, देवळा १४८,  नांदगांव २५९, येवला ६२, त्र्यंबकेश्वर १७०, सुरगाणा ३५, पेठ ३६, कळवण १२५,  बागलाण २२६, इगतपुरी १९६, मालेगांव ग्रामीण २८५ असे एकूण ४ हजार २२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार २३९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४०६  तर जिल्ह्याबाहेरील १११ असे एकूण ८  हजार ८७९  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ७३ हजार १११  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७९.५८,  टक्के, नाशिक शहरात ९१.०१ टक्के, मालेगाव मध्ये  ८५.५९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७४.९६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.४८ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४९९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ७९२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १६०  व जिल्हा बाहेरील ३३ अशा एकूण १ हजार ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

(वरील आकडेवारी आज दि. ९ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790