नाशिक शहरात मंगळवारी (दि. 21 जुलै) 152 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक शहरात मंगळवारी (दि. २१ जुलै) १५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात नाशिक शहरात मंगळवारी (दि. २१ जुलै) १५२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६४, एकूण कोरोना रुग्ण:-६०७०, एकूण मृत्यू:-२१६ (आजचे मृत्यू ०६),  घरी सोडलेले रुग्ण :- ४२८५, उपचार घेत असलेले रुग्ण:- १५६९ अशी संख्या झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय माहिती बातमी प्रसिद्ध करेपर्यंत प्राप्त झाली नव्हती

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) आग्रा रोड, अमरधाम,विष्णू नगर, गणेशवाडी येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २)गांधीनगर नाशिकरोड येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ३) आनंद नगर, नाशिकरोड येथील ७७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ४) माऊली सदन, लक्ष्मी नगर,सायखेडकर हॉस्पिटल मध्ये कामटवाडे  येथील ७७  वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ५) सिडको,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.६) खोले मळा, जयहिंद कॉलनी,अंबड नाशिक येथील ५१ वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.