ज्युपिटर हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटरची निर्मिती

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोना बाधित रुग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिक शहरात नव्याने हॉटेल ज्युपिटर येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. आज (दि.२१) या कोविड केअर सेंटरची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

यावेळी छगन भुजबळ यांनी या कोविड केअर सेंटरची पाहणी करून कोरोना बाधित रुग्णांवर कमी वेळात योग्य उपचार पद्धती राबवून रुग्णाला लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देत शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. तसेच शासनाने सुचविलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आदेशही संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पोलीस अंमलदाराला चाकूने भोसकले; जखमी अवस्थेतही आरोपीला पकडले !

ज्युपिटर कोविड केअर सेंटरमध्ये एखाद्या खाजगी रुग्णालयाप्रमाणेच या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये अद्ययावत सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ज्युपिटर कोविड सेंटरमध्ये यामध्ये एकूण १०० बेडसची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये रुग्णांना सरकारी मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वेळा सात्विक जेवण, आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांची व्यवस्था, २० ऑक्सिजन बेड्स, ४ व्हेंटिलेटर यांसह ४० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर नर्सेस, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी हे सर्व प्रशिक्षित असून कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: रिलेशनमध्ये राहण्यासाठी युवतीचे अपहरण करत घाटात ढकलून देण्याची धमकी

या खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी रोज सकाळी योगासने घेतली जाणार आहे, त्याचबरोबर हास्यक्लब, रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी चेस, कॅरम, दूरदर्शन संच, मोबाईलवर वायफाय सुविधा आणि विशेष म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: जागेचा वाद; लहान भावाकडून मोठ्या भावावर जिवघेणा हल्ला

ज्युपिटर कोविड सेंटर हे खाजगी असले तरी शासनाने ठरवून दिलेल्या शासकीय दरानुसार कोरोना बाधित रुग्णांवर अत्यंत वाजवी दरात उपचार इथं उपलब्ध असणार आहे असल्याची माहिती डॉ.अभिनंदन जाधव व त्यांच्या टिमकडून देण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790