नाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) तब्बल ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९१७, एकूण कोरोना  रुग्ण:-३७,५९७, एकूण मृत्यू:-५९९ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- ३१,०६५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५९३३ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची परिसर निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल, इंदिरानगर, नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) समर्थ चंद्र हौसिंग सोसायटी, पंचकृष्ण लॉन्स जवळ, कोणार्क नगर येथील ६८वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) घर नंबर १, साईपुजा सोसायटी,गुलमोहर नगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) चित्रकूट अपार्टमेंट,  इंदिरानगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) विहित गाव,नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.