जिल्ह्यात आजपर्यंत ४३ हजार २१४ रुग्ण कोरोनामुक्त; १० हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४३  हजार २१४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १० हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १०७३  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५७४, चांदवड १८०, सिन्नर ५८१, दिंडोरी ९९, निफाड  ८७८, देवळा ८८,  नांदगांव ४७१, येवला ११४, त्र्यंबकेश्वर ५८, सुरगाणा ०२, पेठ ०९, कळवण ७०,  बागलाण २९९, इगतपुरी १३५, मालेगांव ग्रामीण ३८० असे एकूण ३ हजार ९३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ९३३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६३९  तर जिल्ह्याबाहेरील ३६ असे एकूण १० हजार ५४६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ५४  हजार ८३३  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  खळबळजनक! पंचवटीतील तरुणाचा हात बांधून पाण्यात टाकलेला मृतदेह आढळला

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ६९.०२,  टक्के, नाशिक शहरात ८२.६३ टक्के, मालेगाव मध्ये  ७६.११ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७८.०१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७८.८१ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ३२१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५९९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १२७  व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण १०७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790