नाशिक शहरात शनिवारी (दि.11 जुलै) 102 कोरोनाबाधीतांची नोंद; 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात शनिवारी (दि. ११ जुलै) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात १०२ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे तर कोरोनामुळे आज ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७८, एकूण कोरोना रुग्ण:-३८६६, एकूण मृत्यू:-१६५, घरी सोडलेले रुग्ण:- २२६४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १४३५ अशी संख्या झाली आहे.

शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा. (टीप:-रुग्ण 144 सदरची आकडेवारी २४ तासाची आहे)

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे: १) भीमशक्ती नगर, टाकळी येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) जुईनगर, आर.टी.ओ. ऑफिस परिसरातील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) कामठवाडे, डीजीपी नगर येथील ४६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ४) गांधीनगर, नाशिक येथील ७७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) भाभानगर, कौटघाट, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) वडाळा रोड, जयदीप नगर, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) शिवाजीनगर सातपूर येथील ३४ वर्षीय  पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) उर्दू शाळे जवळ, गंजमाळ, जुने नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९) बाजारपेठ नासिक ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) भोर मळा, एकलहरे रोड, नाशिक  येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ११) वासन नगर, पाथर्डी फाटा, नाशिक येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या