नाशिक शहरात सोमवारी नव्याने तीन रुग्ण कोरोनाबाधित

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १ जून २०२०) सायंकाळी साडेसात वाजता प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २१७, एकूण मृत्यू -०९ घरी सोडलेले रुग्ण – ८० , तर उपचार घेत असलेले रुग्ण- १२८ अशी झाली आहे.

बिडी कामगार येथील वसाहत येथे ५७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सातपूर वृंदावन कॉलनी येथील २१ वर्षीय युवती व ६१ वर्षीय वृद्ध महिला यांचा कोरोना बाधित आल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.या सातपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील आहेत.या दोन्ही रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.