रेमडीसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अटक

नाशिक (प्रतिनिधी): रेमडीसिवीरच्या काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार सिद्धेश अरुण पाटील याला पालघर येथून अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ६३ रेमडीसिवीर पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस उपयुक्त अमोल तांबे यांनी ही माहिती दिली. आडगाव पोलिसांनी आतापर्यंत तीन नर्सेसश नऊ संशयित तसेच एकूण ८५ रेमडीसिवीर हस्तगत केले आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्धेश हा बोईसर येथील कमला लाईफ सायन्स लिमिटेड या कंपनीत कामाला होता. तेथून अनधिकृतपणे रेमडीसिवीर बाहेर काढून गरजूंना चढ्या दराने विकत असे. या प्रकरणी आता तेथील स्थानिक पोलीससुद्धा पुढील तपास करणार आहेत.