जुन्या नाशकात प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी डॉक्टर पुढे सरसावले

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरासह जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयात तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा रोज वाढतेय. यामध्ये फक्त कोरोनाबाधीतांचीच नाही अन्य आजाराच्या रुग्णांना उपचार द्यावे लागत आहेत, परिणामी शासकीय रुग्णालयांवर ताण वाढत चालला आहे.

नाशिक शहरात हॉटस्पॉट ठरलेल्या जुन्या नाशकात आरोग्य सेवा देण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयांना मदतीचा हात दिला आहे. शहरातील ५० हून अधिक डॉक्टरांनी जुन्या नाशकातील नागरिकांवर प्राथमिक उपचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.