नाशिक जिल्ह्यातून राकेश कोष्टीसह अजून तीन जण तडीपार !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पोलिस आयुक्त पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक कार्यक्षेत्रातील अंतर्गत पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५प्रमाणे आज (दि १ जून २०२०) रोजी पोलीस उपायुक्त अमोल तांबे परिमंडळ १, यांनी तडीपार करण्याचे आदेश जारी केलेले आहेत.

राकेश तुकाराम कोष्टी (वय 26 वर्ष रा. विजय नगर दत्त चौक सिडको नाशिक),जयेश उर्फ जया हिरामन दिवे( वय २५,रा.सिद्धी टावर तिसरा मजला इंदिरा कुंडाच्या समोर पंचवटी ),आकाश विलास जाधव (वय १९ , राहणार मखमलाबाद नाका समोर चौक पंचवटी ),मयूर उर्फ मुन्ना शिवराम कानडे (वय २३ वर्ष शारदा सरस्वती सोसायटी मे हरदम पंचवटी), या सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर व नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून प्रत्येकी दीड वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वरील नमूद गुन्हेगारांना नोव्हेंबर २०१९ मध्ये दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा

परंतु,या चौघांनी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या न्यायालयात हद्दपारी आदेशाविरुद्ध अपील दाखल केले होते. यासंदर्भात विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त कार्यालयातून पुन्हा नोटीस काढून चौकशी करून चौघांना प्रत्येकी दीड वर्षासाठी नाशिक शहर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.