नाशिक शहरात अजून दोन पॉझिटिव्ह; एक टॅक्सी ड्रायव्हर आणि एक गरोदर महिला पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एक सिडकोतील 35 टॅक्सी वर्षीय ड्रायव्हर तर नवश्या गणपती परिसरातील 32 वर्षीय गरोदर महिलेचा समावेश आहे. नाशिक शहरातला आकडा कमी होईल असं वाटलं होतं, पण अजून दोन रुग्ण आढळून आल्याने चिन्ता वाढली आहे. शहरात लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाली असली तरी काळजी घ्यावी.

हे ही वाचा:  Traffic Alert: नाशिक शहरातील ‘या’ वाहतूक मार्गात शनिवारी महत्वाचे बदल !

सिडको पंडित नगर शनी मंदिर परिसरातील ३५ वर्षीय टॅक्सी ड्रायव्हर यांना सर्दी-खोकला झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दि.११ मे २०२० रोजी  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचे घश्याचे स्वाब  तपासणीसाठी पाठवले असता ते आज कोरोना  बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर नवश्या गणपती परिसर येथील ३२ वर्षीय महिला गरोदर असल्याने वैद्यकीय उपचारासाठी  ९ मे २०२० रोजी  देसले  हॉस्पिटलमध्ये भरती होऊन त्यांचे सिझर करण्यात आले त्यावेळी त्यांच्या घश्याच्या  स्वाब तपासणीसाठी पाठवले असता कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज दि.१४/०५/२०२० रोजी प्राप्त झालेला आहे. हे दोन्ही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याचा आदेश नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी निर्गमित केलेले आहे. त्यानुसार देसले हॉस्पिटल हे संस्थात्मक अलगिकरण म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.देसले हॉस्पिटल मधील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्टर,नर्स रुग्णालय कर्मचारी व त्या दरम्यान रुग्णालयात उपस्थित असलेले इतर नातेवाईक या सर्वांना देसले हॉस्पिटल येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले असून त्यापैकी हायरिस्क कॉन्टॅक्ट चे तपासणी नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790