सातपूर व नवीन नाशिकच्या काही भागांमध्ये शनिवारी 16 मे रोजी पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): मुख्य पाईपलाईनवरील अंबड जलकुंभा जवळील 900 मी.मी. व्यासाचा मुख्य व्हॉल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे नविन व्हॉल बसविण्याचे काम करावयाचे असल्याने सातपूर व नवीन नाशिकच्या काही भागांमध्ये शनिवारी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याप्रमाणे आजच नियोजन करावे लागणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, की नाशिक महानगरपालिका हद्दीतील सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन प्रभाग क्र.26 व 27 (भागश) मधील जलकुंभ भरणे व पाणी वितरणाकरीता 900 मी.मी. व्यासाच्या डी.आय.पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सदरची मुख्य पाईपलाईनवरील अंबड जलकुंभा जवळील 900 मी.मी. व्यासाचा मुख्य व्हॉल नादुरुस्त झाला असल्याने अंबड जलकुंभाजवळील  नविन व्हॉल बसविण्याचे काम करावयाचे असल्याने सातपुर व नविन नाशिक विभागातील खालील नमुद ठिकाणी शनिवार दिनांक 16/05/2020 सकाळी 9 वाजेनंतरचा व  दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा खालील भागात होऊ शकणार नाही व रविवार दिनांक 17/05/2020 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

हे ही वाचा:  नाशिक: टवाळखोरांचा धुडगूस; कारची काच फोडून दोघांची केली लुटमार

या भागात पाणीपुरवठा होणार नाही..

प्रभाग क्र.25- इंद्र नगरी, कामठवाडे गांव व परिसर

प्रभाग क्र 26- मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक, आय.टी.आय.परिसर, खुटवड नगर मटाले नगर, आर्शिवाद नगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुल

प्रभाग क्र.27- अलिबाबा नगर, दातीर वस्ती, चुंचाळे घरकुल योजना, दत्त नगर, कारगील चौक, चुंचाळे गांव परीसर  

हे ही वाचा:  नाशिक: ऑगस्टमध्ये पालिकेचे २० इ-चार्जिंग स्टेशन होणार सुरू

प्रभाग क्र.28- लक्ष्मी नगर, अंबड गांव व परिसर, माऊली लॉन्स परिसर, वृंदावन नगर, अंबडगांव ते माऊली लॉन्स मधील पुर्व व पश्चिमेकडील परिसर

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group