घंटागाडी कर्मचारी का उचलत नाहीत कचरा ?

नाशिक(प्रतिनिधी): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर स्वच्छता खूप महत्त्वाची ‌आहे. व म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी वेळोवेळी परिसर स्वच्छ राखण्याचे काम करीत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला‌ घंटागाडी कर्मचारी परिसरातील रस्त्यांवरील कचरा नियमित उचलण्याच्या कामात हलगर्जीपणा करत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो.

पेठेनगरच्या रस्त्यावरील अभ्यासिकेसमोर, शंभर फुटी रस्त्यावरील राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूला,भारत नगरच्या घरकुल योजनेसमोर,‌ जॉगिंग ट्रॅक रस्त्याजवळ तसेच चड्डा पार्क जलकुंभ समोर पाण्याच्या टाकी जवळील रस्त्यावर काही नागरिक कचरा टाकतात‌. म्हणून ते ठिकाण जणू कचराकुंडी क्षेत्रच झाले आहे. त्याचप्रमाणे, अरुणोदय सोसायटी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, कमोद नगर, आदर्श कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी, गुरुकृपा सोसायटी इत्यादी परिसरात ठीक-ठिकाणी पालापाचोळा पडलेला आढळतो.पण तक्रार केल्याशिवाय घंटागाडी कर्मचारी आपले काम करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच तक्रार करून देखील घंटागाडी कर्मचारी कचरा उचलत नाहीत.अशा तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपला हलगर्जीपणा वेळीच थांबवून आपले काम नियमित करावे.अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790