निंदनीय: कोरोनाबाधित पिता पुत्राला शेजाऱ्यांकडून बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कोरोनाबाधित पिता पुत्राला “तुम्ही कोरोनाबाधित आहात इथे कसे राहतात” असं म्हणून शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी एकाच घरातील सहा जणांवर भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी (दि. १३ ओगस्ट २०२०) रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. संजय आनंद पवार (वय-५२, राहणार: रो हाउस नं-४, प्रमुख पार्क, महाले फार्म, सिडको) यांनी याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पवार हे आपल्या राहत्या घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारे आप्पा मोतीराम बच्छाव, त्यांची पत्नी, तसेच त्यांची दोन्ही मुले निशांत आणि प्रशांत व त्यांच्या दोन्ही सुना अशांनी पवार यांच्या घरात घुसून संजय पवार व त्यांचा मुलगा हृषीकेश यांस “तुम्ही दोघे कोरोनाबाधित आहात, इथे कसे राहता ?” असे म्हणून वाईट शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता निशांत याने हातातल्या फरशीचा तुकडा संजय पवार यांच्या उजव्या डोळ्यावर मारला. यात प्रकारात पिता पुत्र दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल