पाणी तुम्बण्यावर काढणार स्मार्ट सिटी प्रकल्पातून तोडगा – पालकमंत्री

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे दहीपूल, सराफ बाजरात दुकानदारांचे नुकसान झाले. आज (दि.१६) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते.

त्यांनी दुकानदारांशी संवाद साधला. यावेळी दुकानदारांनी त्यांच्या तक्रारी छगन भुजबळ तसेच पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समोर मांडल्या. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले “२००८ साली सुद्धा अशीच परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. आणि पावसाळा आला की वारंवार अशी परिस्थिती येथे निर्माण होत असते. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पातून या समस्येवर तोडगा काढण्यात येईल.” महापालिकेशी समन्वय साधून तसेच तज्ञ अभियंत्यांच्या सल्ल्याने यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल.