नाशिक शहरात बुधवारी (दि.१०जून) 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक(प्रतिनिधी): शहरात बुधवारी (दि. १० जून) प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच शहरातील वेगवेगळ्या भागात आता कोरोनाचा शिरकाव होतोय.  नाशिक शहरातील गर्दी आणि कोरोनाबाधीतांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता प्रशासनाची चिंतासुद्धा वाढली आहे. आपण जाणून घेऊ या आज सायंकाळी प्राप्त अहवालातील रूग्णांबाबत सविस्तर माहिती..!

बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळलेल्या रुग्णांमध्ये: लेख नगर-१, जय भवानी रोड (नाशिकरोड)-१, बडी दर्गा-१, बजरंग नगर (आनंदवली)-१, भद्रकाली-१, अंबड लिंक रोड (सातपूर)-१, अजमेरी चौक-२, भाभा नगर-२, सुभाष रोड (नाशिकरोड)-१, अशोका मार्ग-१ यांचा समावेश आहे.

नाशिक शहरात बुधवारी (दि. १० जून २०२०) प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आढळून आलेल्या काही रुग्णांची हिस्ट्री आपण जाणून घेऊया..

जुने नाशिक, नाईकवाडी पुरा येथील ६५ वर्षीय वृद्ध दि.५ जून २०२० रोजी उपचारासाठी दवाखान्यात  दाखल झाले होते.त्यांचा आज  दि.१० जून २०२० रोजी उपचार सुरू असताना निधन झाले आहे.

घर क्रमांक ७०, भद्रकाली फ्रुट मार्केट, नाशिक येथील ६२ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

बंगला क्रमांक १४,आदर्श सोसायटी, लेखा नगर, सिडको येथील ६१ वर्षीय वृद्ध यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे.

रो हाऊस क्र.१९, जय भवानी रोड, जाचक नगर, नाशिक येथील ४१ वर्षीय  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

२५५३, बडी दर्गा समोर,उर्दू स्कूल, नाशिक  येथील ६४ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

खोली क्रमांक ८, सातपूर-अंबड लिंक रोड, पाटील नगर अंबड येथील ४३ वर्षीय  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. या सर्वांवर रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.