प्रवाशांसाठी मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या…

नाशिक (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०५५/०१०५६ अप – डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपुर विशेष गाडी,०१०५९/०१६०६० अप-डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा विशेष गाडी सुरू होत आहेत.

गुरुवारी (दि.१७) पासून रेल्वे  प्रशासनाकडून प्रवासासाठी सुटणाऱ्या विशेष गाड्या फक्त आरक्षित राहतील. यात गाडी क्रमांक ०१०५५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपुर विशेष गाडी शुक्रवार (दि.१८) पासून दर सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी कुर्ला रेल्वे स्थानकावरून दहा वाजून ५५ मिनिटांनी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी गोरखपुर ला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५६ अप गोरखपुर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रविवारी (दि.२०) पासून दर मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी गोरखपूर वरून  सहा वाजून वीस मिनिटांनी रवाना होईल.व दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला सव्वाचार वाजता पोहोचेल.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

गाडी क्रमांक ०१०५९ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- छपरा विशेष गाडी गुरुवारी (दि.१७) पासून दर मंगळवारी, गुरुवारी व  शनिवारी कुर्ला रेल्वे स्थानकावरून सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी छपरा येथे रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६० अप छपरा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी शनिवारी (दि.१९) पासून दर गुरुवारी,शनिवारी व सोमवारी छपरा रेल्वे स्थानकावरून रवाना होईल. व दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला चार वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.नाशिक आणि भुसावळ येथे या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू