निफाडमध्ये ६.५ इतका तापमानाचा नीचांक.. तर नाशिक ८.४ !

नाशिक (प्रतिनिधी): हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबर रोजी निफाडचे तापमान सर्वात कमी म्हणजेच ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. तर नाशिकचा पार ८.४ अंश सेल्सिअस इतका घसरला आहे. राज्यात येत्या दोन दिवसात थंडीची लाट येईल असे सांगण्यात आले आहे. उत्तर भारतातून थंडीचा तडाखा राज्याच्या दिशेकडे सरकण्यास सुरुवात झाली आहे. अशातच तापमानाने निफाडमध्ये नीचांक गाठला आहे.

कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात थंड वातावरण आहे. निफाडनंतर परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.