मद्य विक्री दुकानांबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काय आदेश दिले ?

नाशिक (प्रतिनिधी): शहरात आज (दि. 4 मे 2020) रोजी मद्य विक्रीची दुकानं उघडण्यास जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मुभा दिली होती. आणि त्याप्रमाणे दुपारी दुकानं उघडण्यातही आली. मात्र यावेळी ग्राहकांनी दुकानांबाहेर प्रचंड गर्दी केली. या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा तर उडालाच शिवाय पोलीस प्रशासनावर गर्दी आवरण्याचा प्रचंड ताण आला. त्यामुळे काही वेळातच दुकानं बंद करायची वेळ आली. त्यामुळे…

अशा गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी ताबडतोब मद्य विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले. पुढील आदेश येईपर्यंत आता मद्यविक्रीची दुकानं बंदच राहतील.