Breaking News: नाशिक शहरात अजून 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (विशेष प्रतिनिधी): नाशिक शहरात अजून 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गुरुवारी (दि.16 एप्रिल 2020) सातपूर अंबड लिंक रोड येथील 63 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. ही महिला संजीव नगर भागातील आहे. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या काही संशयित रुग्णांना मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. त्यापैकी 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सातपूर-अंबड लिंकरोडवरील संजीव नगर परिसरातील पाचशे मीटरपर्यंतचा भाग प्रति बं धि त करण्यात आला होता. त्यामुळे आता नाशिक शहराला कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं लक्षात येतंय..!