शाळांना आता २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या !

नाशिक (प्रतिनिधी): शाळांना येत्या २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे. यादरम्यान ऑनलाईन क्लासेसही बंद राहणार आहेत. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत आणि फक्त ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत.. या शाळांसोबतच नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यालयांना येत्या २० नोव्हेम्बार्पर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. खरं म्हणजे शिक्षकांच्या मागणीनंतर या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने १२ ते १६ नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी जाहीर केली होती. परंतु केवळ पाच दिवस सुट्टी मिळत असल्याने शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. शिक्षकांनी थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यामुळे आता तब्बल १४ दिवसांची सुट्टी ही वाढवून देण्यात आली आहे.