कोरोना संदर्भातला आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
वाढत्या कोरोना प्रादुर्भाव संदर्भात आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय पथक नाशिक मध्ये दाखल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच ह्या संपूर्ण परिस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात केंद्रीय पथकाने भेट देऊन आढावा घेतलाय.

त्याच बरोबर जिल्ह्यात वेगवेगळ्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी जाऊन हे पथक कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढत आहे यामागचं कारण शोधून त्याबाबतचा अहवाल देण्याचं काम करणार आहे. देशातील ज्या राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे त्या राज्यातील माहिती घेण्यासाठी केंद्र सरकार ने अश्या पथकांची नियुक्ती केली आहे. त्याच अनुषंगाने हे केंद्रीय पथक राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव वाढण्या संदर्भात माहिती घेण्याचं काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून हे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. पुढील काही दिवस हे पथक शहरातील विविध हॉटस्पॉट आणि कोरोना प्रधुर्भावा असलेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेणार असून त्याबाबतचा अहवाल केंद्राला दिला जाणार आहे.