नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळला आहे.
या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री १०:०० वा. सुमारास घडल्याचे समजते.
घटनास्थळी ११:३० वा. सुमारास यंत्रणा पोहचल्यानंतर गाडी संपूर्ण जळून खाक झालेली असल्याचे दिसले.
प्राथमिक माहितीनुसार महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ. सुवर्णा वाजे असल्याचे समजते. त्या मनपाच्या मोरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. विल्होळी परिसरातील स्वतःच्या चारचाकी वाहनात पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वाडीवऱ्हे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचा घातपात झाला की, अन्य काही कारणाने ही घटना घडली. याबाबत लवकरच माहिती समोर येणार आहे. असून पुढील तपास पोलीस करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: स्कूल व्हॅनला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील ‘या’ भागांत ‘या’ दिवशी पाणीपुरवठा नाही