Breaking: नाशिकमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करुन कंपनी मॅनेजरची हत्या…

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कंपनी मॅनेजर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, रिक्षावाल्याची माणुसकी, दवाखान्यात नेलं, मात्र….

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली असून पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडवलेणी परिसरात हा प्रकार घडला आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी कंपनी व्यवस्थापकावर धारदार शस्त्राने वार करत रस्त्यावर फेकून दिले.

त्यानंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. मात्र या घटनेने नाशिक शहर हादरले आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील पाथर्डी फाटाजवळ कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी फाटा नजीक असलेल्या पांडव लेणीच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

रोहिणी इंडस्ट्रीजचे मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मॅनेजर असलेले योगेश मोगरे हे आपले काम उरकून घरी निघाले होते. गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे चारचाकी कारने जात होते. यावेळी हॉटेल आंगण समोर अज्ञात दोन संशयितांनी त्यांची गाडी अडवून थांबवले. यावेळी संशयितानी लपविलेले धारदार कोयते, हत्यारे काढून मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

या हल्ल्यात योगेश मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा चालकाने मोगरे यांना रिक्षात बसवून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, योगेश मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली. ही पळवून नेलेली किया कार वाडीवऱ्हे शिवारात सापडली आहे. तेथून संशयीत दुसऱ्या कारने मुंबई व पुण्याच्या दिशेने फरार झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे..

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

घटनेनंतर मोगरे यांना एका रिक्षाचालकाने त्यांना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी मॅनेजर योगेश मोगरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पहाणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here