१ एप्रिलपासून नाशिक मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग !

नाशिक (प्रतिनिधी): अखेर नाशिक महानगरपालिकेने येत्या १ एप्रिलपासून कार्यरत असलेल्या ४६७३ अधिकारी, कर्मचारी व ३२३१ सेवानिवृत्तीधारकांना सातवा वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतनात सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर नाशिक महापालिकेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून पे प्रोटेक्शन दिले गेल्याने एकही कर्मचाऱ्याचे वेतन कमी होणार नाही. तसेच एक एप्रिलपासून प्रत्यक्ष लाभ होणार असून कोणाचेही नुकसान होणार नाही असे मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.