त्र्यंबकेश्वर: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून नाशिकच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

त्र्यंबकेश्वर: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून नाशिकच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): शहरापासून अवघ्या २८ किलोमीटर अंतरावरील त्र्यंबकेश्वर येथे फिरण्याचा बहाणा करत एका संशयित तरुणाने अल्पवयीन मुलीला पंचवटीतून दुचाकीवर बसवून नेले. तेथील एका लॉजवर कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देत तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

त्र्यंबकेश्वरला विकेंडला या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे बहुतांश पर्यटकांना पोलिसांकडून माघारी धाडले जात होते. अशातच पोलिसांची नजर चुकवत पंचवटी भागातील संशयित रोहित आनंद म्हसदे (वय २५,रा.फुलेनगर, पंचवटी) हा एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्र्यंबकेश्वरला फिरून येण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. फिर्यादी पीडित ही अल्पवयीन मुलगी आणि संशयित रोहित हा एकाच ठिकाणी कामाला असल्याने ते एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहित याने त्र्यंबकेश्वरध्ये पोहोचल्यानंतर येथील एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिला कोल्ड्रिंक पाजण्याचा बनाव करत त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित रोहितविरुद्ध बलात्कार बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुऱ्हा दाखल करून अटक केली आहे.