नाशिक (प्रतिनिधी): फेब्रुवारी-मार्च मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांची निकालाची तारीख मंडळाच्या वतीने करण्यात येईल असे राज्य मंडळाने सांगितले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दहावी-बारावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाद्वारे परस्पर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यावर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अजूनपर्यंत कुठलीही माहिती न दिल्याचे स्पष्ट केले आहे. निकालाची तारीख मंडळाच्या वतीने अधिकृत ई-मेल, प्रसिद्धी माध्यमे आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. असे राज्य शिक्षण मंडळाने सांगितले आहे.