नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक भूमीअभिलेखचे आणखी दोघे आणि खासगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीची कीड अतिशय खोलवर रुजल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जवळपास दररोज लाचखोर सापडत आहेत. भूमीअभिलेख विभागातही लाचखोरीला ऊत आला आहे.
काही दिवसांपूर्वी भूमीअभिलेखच्या दोघे सापडले असताना आता पुन्हा दोघे आणि एक खासगी एजंट एसीबीच्या गळाला लागला आहे. आता त्र्यंबकेश्वर भूमीअभिलेख कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचला होता.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (वय 43, रा. फ्लॅट नं 6, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भू करमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय 56, रा. रो हाऊस नं 3, 4, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुनचाळे शिवार, अंबड नाशिक) व वैजनाथ नाना पिंपळे, (वय 34, रा. रो हाऊस नंबर 1, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) अशी लाखोरांची नावे आहेत. या तिघांनी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली.
- Breaking: वणी-सापुतारा मार्गावर भीषण अपघात; चार महिन्यांच्या चिमुकलीसह कुटुंबातील तिघांचा मृत्यू
- मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार!
फायनल लेआउट मध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र आपल्या गटात सरकू देऊ नये, अशी मागणी एका व्यक्तीने केली. त्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यास ही व्यक्ती तयार झाली नाही. अखेर समशेर आणि राऊत यांनी ६ लाख रुपये एवढी लाच मागितली. त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम ३ लाख रुपये करण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम खासजी एजंट पिंपळे हा स्वीकारणार होता. हा सर्वप्रकार एसीबीच्या निदर्शनास आला. सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर एसीबीने समशेर, राऊत आणि पिंपळे या तिघांवर कारवाई केली आहे.
ही कारवाई एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो ना.प्रकाश महाजन, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. अजय गरुड , चा. पो. शि. परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. यासंदर्भात एसीबीकडे १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि तक्रार द्यावी, असे आवाहन अधिक्षक वालावलकर यांनी केले आहे.