महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत मनपाने महत्वाची सूचना दिली आहे.

मनपाचे गंगापुर धरण पंपिंग पंपिंग स्टेशन येथील मिटरींग क्युबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट,

व सबस्टेशन पॅनल रुममधील फिडरचे इनकमिंग आऊटगोईंग सप्लाय किट, वीज वितरण कंपनी बाजुकडील सिक्स पोल स्ट्रक्चरवरील ३३ के.व्ही. इनकमिंग व आऊटगोईंग जंपर बदलणे तातडीची बाब आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सातपूर MIDCमध्ये कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

तसेच मुकणे धरण विल्होळी जलशुध्दीकरण केंद्रातुन जाणारी मुख्य पाईप लाईन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती कामासाठी गुरुवार दिनांक २०/०१/२०२२ रोजी सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपावेतो एकुण ८ तासांसाठी शटडाऊन आवश्यक आहे.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

सबब मनपाचे  गंगापुर धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून शहरास होणारा रॉ.वॉटर पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याने संपुर्ण शहराचा गुरुवार दि.२०/०१/२०२२ रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच दि.२१/०१/२०२२ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३१ पर्यंत अर्जसंधी;२० फेब्रुवारी राेजी हाेणारी परीक्षा पुढे ढकलली

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790