नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पंचवटी: चौथ्या मजल्यावरून पडल्याने ४१ वर्षीय इसमचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): चौथ्या मजल्यावरून पडून ४१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी भागात घडली आहे.
मेरी रासबिहारी लिंकरोड भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे स्लॅबचे काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला.
कैलास धोंडीराम कोरडे (४१ रा.गणेशगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- Breaking: इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
- निफाड शिवडी रेल्वे गेटला ट्रकची धडक; मोठा अनर्थ टळला
कोरडे हे बुधवारी औदूंबर लॉन्स परिसरात सुरू असलेल्या श्रीजी दर्शन अपार्टमेंट या नुतन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्लॅबचे काम करीत असतांना ही घटना घडली. स्लॅब टाकत असतांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने ठेकेदार प्रकाश पटेल यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. राहूल पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले.