नाशिक: “मेरी गाडी को कट क्यू मारा” असं म्हणत आधी मारहाण आणि मग लूट..
नाशिक (प्रतिनिधी): “मेरी गाडी को कट क्यू मारा” असं म्हणत असं म्हणत आधी भांडण केलं आणि मग लुटलं..
दुचाकीला कट मारल्याच्या वादातून चार जणांनी कार चालकाची पाच लाखांची रक्कम लुटून नेल्याचा प्रकार अशोक मार्ग येथे उघडकीस आला.
याप्रकरणी संशयित राहुल, अमिर, (पूर्ण नाव नाही ) आणि त्यांचे दोन साथीदारांच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि धीरज हिरण (रा. हॅप्पी होम काॅलनी, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक मार्ग येथून कार (एमएच १५ एफसी ९८८१) मधून जाताना चार अनोळखी इसमांपैकी संशयित राहुल आणि अमिर या दोघांनी दुचाकीवर ( एमएच १५ एचके ७६०८ ) येत कार थांबवली. ‘मेरी गाडी को कट क्यू मारा’ असे बोलत शिवीगाळ व मारहाण केली. संशयितांनी फोन करून आणखी दोघांना बोलावले. संशयितांनी कारची तोडफोड करत कारमधील ड्राॅवरमध्ये ठेवलेली पाच लाखांची रक्कम आणि कागदपत्र जबरीने लुटून नेले. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.