नाशिक: गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

नाशिक: गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

या करिता शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे.

मात्र काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही खड्डे बुजविले जात नाहीये. याच खड्ड्यामुळे नाशिकरोड परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक रोड भागात गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर स्टार प्लस मार्केट जवळ गेल्या पंधरा दिवसांपासून रस्ता खोदलेला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

मात्र अद्याप हा खड्डा बुजवलेला नाही. या खड्डयान सोमवारी (दि.23 मे) मोबिन गफ्फार मणियार वय 32 वर्ष या दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला.

काय आहे घटना:
मध्यभागी रस्ते खोदलेले असल्याने परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येते. यामुळे वाहनचालक विरुद्ध दिशेने आपले वाहन काढत असतो. असाच प्रकार मणियार यांच्या सोबत घडला. मोबिन मणियार सोमवारी सकाळी आठ वाजता देवळाली गावाकडून चितेगाव कडे जात होते. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर खोदकाम केलेले असल्याने एक दुचाकीस्वार मणियार यांच्याकडे विरुद्ध दिशेने आला.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची मणियार यांना धडक लागल्याने ते खाली पडले. जवळच गॅस पाईपलाईन साठी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर मोठमोठे दगड होते. या दगडावर मणियार यांचं डोकं आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि लहान मुलगा व मुलगी आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

नागरिकांची मागणी:
एक महिन्यावर पावसाळा आला आहे. नाशिक शहरात रस्त्याच्या मधोमध खोड काम केले आहे. काही ठिकाणी साधी माती टाकून हे खड्डे बुजविले जात आहेत तर काही ठिकाणी जसेच्या तसेच आहेत. यामुळे नाशिकरोड परिसरात एकाच मृत्यू झाला आहे. रस्त्यांची परिस्थिती पाहता पावसापूर्वी रस्ते व्यवस्थित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here