नाशिक: गॅस गळती होऊन स्फोट, महिलेचा जागीच मृत्यू; 16 वर्षीय तरुणी जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून एका दुर्घटनेची बातमी समोर आली आहे.
नाशिकमध्ये गॅस गळती होऊन स्फोट झाला आहे.
यात दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली आहे.
नाशिकच्या सातपूर परिसरात गॅस गळती होऊन स्फोट झाला. स्फोटात अर्चना सिंग या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्फोटात महिलेसह आस्था सिंग ही 16 वर्षीय तरुणी जखमी झाली. घटना घडल्यानंतर दोघींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र महिलेचा आधीच मृत्यू झाला होता. जखमी तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10506,10503,10499″]
गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान स्फोटात घरगुती साहित्य जळून खाक झालंय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
गॅस सिलिंडर गळतीमुळे वाढताहेत दुर्घटना:
गॅस सिलिंडर गळतीमुळे आग आणि स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या सहा वर्षात मुंबईत 26 हजार 855 आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी 20 हजार 9 आगीच्या दुर्घटना सदोष विद्युत प्रणालीमुळे घडल्या असल्याचा निष्कर्ष दुर्घटनांच्या चौकशी अहवालात देण्यात आला आहे. उर्वरित 684 आगीच्या दुर्घटना निरनिराळ्या कारणांमुळे झाल्याचं अहवालात नमूद केलं आहे. लोकसत्तानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
गेल्या सहा वर्षांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे 332 घटना घडल्या. 6 वर्षातील गॅस सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनांची संख्या तुलनेत कमी आहे मात्र तरीही मृत आणि जखमींची संख्या वाढती आहे.