नाशिक: “इथे शिवीगाळ करू नका” असे सांगितले म्हणून दुकानदार महिलेचा विनयभंग
नाशिक (प्रतिनिधी): “येथे शिवीगाळ करू नका,” असे सांगितल्याचा राग आल्याने एका युवकाने दुकानदार महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याचा प्रकार पाथर्डी गावात घडला.
फिर्यादी महिला ही तिच्या किराणा दुकानात होती. त्यावेळी संशयित आरोपी राकेश समाधान शेजूळ (वय 20, रा. मधुकरनगर, राजवाडा, पाथर्डी गाव) हा त्याच्या मित्रासह तेथे आला.
त्यावेळी शेजूळ हा त्याच्या मित्राला शिवीगाळ करीत होता.
- नाशिक: त्र्यंबकरोडवर भरधाव कार दुभाजकावर आदळून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
- नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि. १७ डिसेंबर) पाणीपुरवठा नाही..
यावेळी फिर्यादी महिलेने त्याला इथे शिवीगाळ करू नको असे सांगितले. त्याला समजावून सांगितल्याचा राग आल्याने त्याने दुकानदार महिलेची कॉलर पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच रस्त्यावरील दगड उचलून फेकल्याने महिलेच्या खांद्यास दुखापत झाली. त्याने एवढ्यावरच न थांबता पीडित महिलेच्या आईवडिलांना धमकी देऊन पळून गेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात राजेश शेजूळविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.