नाशिकरोडला प्रवाशाला लुटणारा ‘तो’ रिक्षाचालक व त्याचा साथीदार अटकेत..रिक्षाही जप्त..
नाशिक (प्रतिनिधी): दि. 31 ऑगस्ट 2021 रोजी तामिळनाडू येथील तिलक तिरुमणी हे नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते विजय-ममता स्टॉप असा रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवश्याला लुटणाऱ्या रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला नाशिकरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तिलक हे प्रवाशी प्रवास करत असताना मुक्तिधाम रोडवर रिक्षात शेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती व रिक्षाचालकाने संगनमताने तिलक तिरुमणी यांना लाथाबुक्क्यांनी मा’र’हा’ण करत त्यांना ज’ख’मी करत त्यांची लूट केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेतील संशयित रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार याने मा’र’हा’ण आणि लूट केलेल्या तिलक रुक्मिणी यांना याबाबत काही तक्रार केल्यास जी’वे मा’र’ण्याची ध’म’की देखील देण्यात आली होती. या प्रकारात तीरुमणी यांचा 15 हजारांचा मोबाईल, 15 हजारांचे मशिनरी टेस्टिंग कंट्रोल युनिट, 500 रुपये रोख असा 30 हजार 500 रुपयांचा ऐवज ब’ळ’ज’ब’रीने लुटला होता.
या घटनेचा तपास करत असताना नाशिकरोड पोलीसांची तीन पथके रवाना झाली होती. तर रिक्षाच्या मिळालेल्या वर्णनानुसार तपास करत असताना सदर रिक्षा ही भगवा चौक, पंपिंग स्टेशन या ठिकाणी मारुती मंदिराजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार सापळा रचला गेला. रिक्षा व त्यात बसलेले दोन संशयित इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यात नाशिकरोड बागुलनगर विहितगाव येथील राहणारा संशयित स्वप्रिल देवीदास चव्हाण व देवळाली कॅम्प भगूर बसस्थानकाजवळ राहणाऱ्या साजिद शाह शेख यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी ह्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली.
त्यांच्याकडून सॉफ्टवेअर पार्ट, मोबाईल फोन, टुल्सकिट आणि अॅटोरिक्षा असा एकूण 1 लाख 30 हजार रुपये किमीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे.
नाशिक शहराच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
मॉर्निंग वॉकला जाताना अपघात; पुत्रासमोर पिता ठार