धक्कादायक: नाशिकला शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करत ३९ लाखांची लूट

धक्कादायक: नाशिकला शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करत ३९ लाखांची लूट

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबतांना दिसत नाहीये.

आता तर एका व्यावसायिकाला धमकावत तब्बल ३९ लाखांची लुट केल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये एका शेअर मार्केट व्यावसायिकाचे अपहरण करून दोन मोबाइल, २० लाख रुपयांची रक्कम तसेच ऑडी कार असा ३९ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यातील ऑडी कार सातपूर पोलिसांनी औरंगाबाद येथून हस्तगत केली असून फरार आठ संशयितांचा तपास सातपूर पोलिस करत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

सदर घटनेत संशयितांच्या तावडीतून शिताफीने या व्यावसायिकाने सुटका करून घेतली आहे. सातपूर पोलिसांनी संशयिताच्या विरोधात अपहरण करून लूटमार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय करणारे नरेंद्र बाळू पवार (राहणार: खुटवडनगर) यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. शेअर मार्केटशी संबंधित काम आहे असे सांगून त्यांना २९ जून रोजी रात्री साडेआठला आयटीआय सिग्नल येथे बोलावले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

ते आल्यानंतर पवार यांना बळजबरीने दुसऱ्या कारमध्ये बसवत चाकूचा धाक दाखवत पाच कोटी रुपये दे, अन्यथा मारून टाकू अशी धमकी देत अपहरण केले. पवार यांच्या खिशातील दोन मोबाइल काढून घेतले. यामुळे भेदरलेल्या पवार यांनी औरंगाबाद येथील मित्राकडून पैसे घेऊन देतो असे सांगत औरंगाबादच्या जय खरात या मित्राला फोन केला. खरातने औरंगाबादच्या सिडको बस स्टँड येथे संशयितांच्या औरंगाबाद येथील एका साथीदारास २० लाख रुपये दिले. यानंतर पवार यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली असता पवार यांनी संशयितांना आपण मित्राकडे जाऊ असे सांगत आपल्या घराकडे नेले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

संशयिताला बाहेर थांबवून रात्री बाराच्या सुमारास शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली. या संपूर्ण घटनेत ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल फोन, १० लाखांची ऑडी कार तसेच २० लाख रोख रक्कम असे एकूण ३९ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज धमकावून लुटून नेला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here