धक्कादायक: नाशिकला घराच्या टेरेसवरून उडी मारत विवाहितेची आत्महत्या…
नाशिक (प्रतिनिधी): घराच्या टेरेसवरुन उडी मारत २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडकोतील खुटवड नगर येथे रविवारी (दि. २) सकाळी घडली आहे.
नाशिकच्या सिडको मध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी 2 जानेवारी ला सकाळी घडली आहे.
स्वतःच्या घराच्या टेरेसवरुन उडी मारत महिलेने आत्महत्या केली आहे.
मयत महिलेचे नाव प्रियंका आकाश पगारे असून तिचे वय २४ वर्ष आहे.
ह्या महिलेचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. महिलेजवळ सुसाईड नोट मिळून आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला प्रियंका आकाश पगारे रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवडनगर येथे रहात होती. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तिच्याकडे पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9566,9562,9560″]
प्रियंका हिला उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले. तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले. मात्र डॉ. धूम यांनी तपासून मृत घोषित केले आहे. सुसाईड नोटमध्ये तिने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तरीही हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.