धक्कादायक: नाशिकला चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर बलात्कार
👉 कॅनडा कॉर्नर येथे ऑफिस स्पेस भाड्याने देणे आहे. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा..
नाशिक (प्रतिनिधी): विवाहित महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्या लहान मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तीन दिवस तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताला सातपूर पोलिसांनी अटक केली.
अझर अख्तार शेख (रा. सातपूर राजवाडा) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (दि. १७) पीडित महिला जेवण झाल्यानंतर घराजवळ पायी फिरत असताना संशयिताने तिला चाकूचा धाक दाखवला. लहान मुलीला जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने दुचाकीवर बसवून त्र्यंबकेश्वर, येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवत बलात्कार केला.
तसेच पांडवलेणी येथे मित्राच्या घरी नेत बलात्कार केला. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला श्रमीकनगर कडेपठार येथे पथकाने अटक केली. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्याम जाधव तपास करत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking: नाशिक शहरातील ‘या’ नामांकित शाळेत विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ!
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत या दिवशी पाणीपुरवठा नाही
नाशिक: आता बोला… प्रियकराच्या व भावाच्या मदतीने पत्नीनेच फोडले स्वत:चेच घर