खळबळजनक: सप्तशृंगी गडावर सुरक्षारक्षकाचा खून
नाशिक (प्रतिनिधी): सप्तशृंगगडावर सुरक्षारक्षकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गडावरील गणेश घाटाच्या धबधब्यापुढे रात्री ९ वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या युवकाचा खून झाला असून सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर तो कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरी ते सप्तशृंग गड या दहा किलोमीटरच्या अंतरात गणेश घाटाच्या धबधब्याजवळ एक युवक जखमी असल्याचे गडावर दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांनी पाहिले.
- नाशिक: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
- नाशिक: रस्ता खचल्याप्रकरणी महापालिकेची ‘या’ नामांकित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस
त्यांनी सप्तशृंगगडावरील न्यासाच्या कार्यालयास ही माहीती दिली. घटनास्थळावर न्यास प्रशासनाने रुग्णवाहिका पाठविली व वरीष्ठ अधिकारी व पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली असून अर्जुन अंबादास पवार (वय ३०, रा. सप्तशृंगगड) असे या युवकाचे नाव आहे. हा युवक सप्तशृंग गडावर देवी संस्थान मध्ये सुरक्षारक्षक या पदावर कार्यरत होता अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली. याप्रकरणी कळवण पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सप्तशृंगगडावर खळबळ उडाली असून अधिक तपास कळवण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790