हॉटेल ज्युपिटरच्या आवारातील मंदिरात चोरी!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील महामार्गावरील हॉटेल ज्युपिटरच्या आवारातील मंदिरातून चोरट्यांनी  पंधरा हजाराची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.९ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. मंदिरातील श्रीयंत्र चोरून नेल्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे. याविरोधात योगेश पोपट इंगळे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

शुक्रवारी (दि.०९) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संरक्षकभिंत ओलांडून हॉटेलच्या आवारातील देवीच्या मंदिरात प्रवेश केला. मंदिरातून पंधरा हजार रुपये किमतीचे श्रीयंत्र चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास हवालदार भोजने हे करत आहेत.